तलाठी भरती कागदपत्र तपासणी बाबत 26/04/2024 रोजी परिपत्रक जारी

Talathi Recruitment Document Verification 2023 : जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय तलाठी पदभरती 2023 चे कागदपत्रे तपासणी बाबत महत्वाचे परिपत्रक दिनांक 26/04/2024 रोजी जारी करण्यात आले आहे.

तलाठी पदभरती-2023 चे अनुषंगाने प्रारुप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुचित करण्यात येते की, दिनांक 6 मे, 2024 रोजी सकाळी 10.30 वा.पासुन प्रारुप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्त ऐवज तपासणी ही नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

तसेच दिनांक 7 मे, 2024 रोजी सकाळी 10.30 वा.पासुन प्रारुप निवड यादीमध्ये प्रतिक्षा सुचीत असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी सुद्धा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

तलाठी भरती 2023 कागदपत्र तपासणी

 • अर्जातील नावाचा पुरावा (प्रवेशपत्र / ऑनलाईन अर्ज)
 • वयाचा पुरावा (जन्मतारखेचा पुरावा)
 • शैक्षणीक अर्हता (10/12/पदवी (इ.पुरावा)
 • सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. (जातीचे प्रमाणपत्र)
 • जात वैधता प्रमाणपत्र
 • अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (उन्नत/प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र)
 • अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सौनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अशंकालिन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा
 • अधिवास प्रमाणपत्र
 • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
 • संगणक प्रमाणपत्र
 • आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र
 • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. (सोबतच्या विहीत नमुन्यात)
 • उमेदवाराचे आधारकार्ड / पॅन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / Driving Licence यापैकी एक

उमेदवाराने कागदपत्रे वरील प्रमाणे कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

परिपत्रक पहा

Leave a Comment