Ladki bahin : या महिलांना नाही मिळणार ‘लाडकी बहीण’ चे दीड हजार रुपये

Ladki Bahin : राज्य सरकारने राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या महिलेस प्रती महिना 1500 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे.

राज्य सरकारने प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. मात्र, या योजनेतून निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांनादेखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे योजनेचा लाभ घेण्यास उत्सूक असणाऱ्या महिलांसाठी नाराजी आहे.

या लाभार्थीना वगळले’

  • शासकीय कर्मचारी – शासकीय सेवेत असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
  • श्रावण बाळ योजना – 60 वर्षांपेक्षा जास्त व 21 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे.
  • अडीच लाख उत्पन्न – ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने निराधार लाभार्थीना मदत देण्यात येते. आता डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात अनुदान देण्यात येणार आहे

Leave a Comment