10 रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार – नवीन नोटबंदी, फॅक्ट पहा

10 Rupees Note update : नोटाबंदीबाबतच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता काही युजर्स 10 रुपयांच्या नोटांवर 29 मार्चपासून बंदी घालणार असल्याचा दावा करत पोस्ट शेअर करत आहेत. 10 रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर करून यूजर्स हा दावा करत आहेत.

मात्र, 10 रुपयांची नोट बंद होणार असल्याची केवळ अफवा आहे. आरबीआयने अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. याआधीही 100 रुपयांच्या नोटांवर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, तो दावाही खोटा असल्याचे आढळून आले होते.

RBI ने 10 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला दावा ही अफवा आहे. अशी कोणतीही माहिती मिळाल्यास प्रथम ती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर तपासा.

24 जानेवारी 2021 रोजी, PIB ने पोस्ट केले की RBI ने मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही.

आणखी नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment