PF Acount New Rule : पीएफ खात्यामधून पैसे काढण्याचे नियम बदलले, वाचा सविस्तर

PF Acount Withdrawal Rule : नोकरदारांचे भविष्य सुकर व्हावे म्हणून सरकारने ईपीएफओची (EPFO) सुविधा दिलेली आहे. ईपीएफओ अंतर्गत नोकरदारांचे प्रतिमहिना एक निश्चित रक्कम कापली जाते.

पगारातून कापलेली रक्कम निवृत्तीनंतर ठरवण्यात आलेल्या व्याजासह परत नोकरदारांना निवृत्तीवेतनाच्या रुपात परत केली जाते. याच निधीचा नोकरीदरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करता येतो. दरम्यान, याबाबतच्या नियमांत आता सरकारने बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता आधी ठरवण्यात आलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम नोकरदारांना काढता येणार आहे.

EPFO ने आपल्या वैद्यकीय निधीसाठीच्या ॲडव्हान्स मस्त दिसतेस विथड्रॉलच्या नियमांत बदल केला आहे. अगोदर नोकरदाला जास्तीत जास्त 50,000 रुपयांचा क्लेम करता येत होता. आता हेच प्रमाण एक लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ईपीएफओने यासंदर्भात 16 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले आहे. याच सर्क्युलरमध्ये या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे.

EPFO ने फॉर्म 31 च्या पॅरा 68J अंतर्गत पीएफमधून आंशिक पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. ईपीएफच्या फॉर्म 31 अंतर्गत निवृत्तीवेतनासाठी तुम्ही जमा करत असलेल्या रकमेतून आंशिक रक्कम काढता येते. खर खरेदी, लग्न, वैद्यकीय उपचार अशा कामांसाठी पीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढता येते.

फक्त पुढील परिस्थितीत काढता येणार पैसे

फॉर्म 31 मधील 68J पॅरानुसार नोकरदारांना आपल्या पीएफ खात्यातून आशिक रक्कम काढता येते. या फॉर्मअंतर्गत आधी फक्त 50,000 रुपये काढता यायचे. मात्र आता हीच रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईपीएफओनुसार आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळातच हे एख लाख रुपये काढता येतील.

स्वतः हा कर्मचारी किंवा कर्मचाऱ्याचे कुटुंबीय रुग्णालयात भरती असतील, तेव्हा ही रक्कम काढता येईल. त्यासाठी कर्मचारी शासकीय रुग्णालय किंवा नियमांत बसणाऱ्या रुग्णालयात दाखल असणे गरजेचे आहे. रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर पीएफमधील 1 लाख रुपये काढता येतील.

Leave a Comment