खुशखबर !… 200 युनिट मोफत वीज वाटप विषय निधी वितरण करणे बाबत दि. 26/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

200 युनिट मोफत वीज वाटप विषय निधी वितरण करणे बाबत दि. 26/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संदर्भीय शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्चत पत्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर केलेले आहे. सदर धोरणातील परिच्छेद क्रमांक ७.४ मध्ये नमूद हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रतिमाह २०० यूनिट पर्यंत मोफत वीज देण्याबाबत दिनांक १०.११.२०२३ रोजीचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.सदर शासन निर्णयानुसार राज्यातील हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीजदेण्याबाबत या योजने अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याबाबत या योजनेकरीता वित्त विभागाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर निधी रू. ३,५०,०९,०००/- (अक्षरी- तीन कोटी पन्नास लाख नऊ हजार फक्त) च्या ७० टक्के म्हणजे रु.२,४५,०६,३००/- (अक्षरी दोन कोटी पंचेचाळीस लाख सहा हजार तीनशे फक्त) इतका निधी उपलब्ध केला आहे.सदर निधी उपलब्धतेनुसार “मागणी क्रमांक व्ही-२, लेखाशिर्ष २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११० संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, ३३ अर्थसहाय्य (०३) (०५) एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज योजना (२८५१ ७४३६), ३३ अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली रु.२,४५,०६,३००/- (अक्षरी दोन कोटी पंचेचाळीस लाख सहा हजार तीनशे फक्त) इतका निधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर निधीतून वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय

Leave a Comment