7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी बाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित

7th Pay Commission Update : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यासाठी दिनांक 16 मार्च 2024 रोजी वित्त विभाग द्वारे महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्दये दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करुन शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात येत आहे. त्या सबंधित शासन निर्णय पहा

शासन निर्णय

Leave a Comment