PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत फायरमन पदांची भरती, पात्रता 10 वी पास

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत फायरमन पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ऑनलाइन मोडद्वारे 150 पदे भरण्यासाठी नोकरी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवारांनी PCMC करिअरची अधिकृत वेबसाइट pcmcindia.gov.in भरती 2024 ऑनलाइन अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-एप्रिल-2024 आहे.

पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर

एकूण पदे – 150

वरील पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षणनिहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) या लिंकवर, तसेच होमपेजवर नोकरीविषयक (Recruitment) या मेनूमध्ये दि. 22 एप्रिल 2024 पासून पाहण्यास उपलब्ध होतील.

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment