शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार; नेमका पगार किती वाढणार?

8th Pay Commission Salary : शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार; नेमका पगार किती वाढणार? केंद्रीय शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा करत आहेत. या वेतन आयोगामुळे त्यांच्या पगारात वाढ होईल.

RTE Admission 2024-25 :- या दिवशी प्रसिद्ध होणार निवड यादी जाहीर, पहा

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता हे सरकार कामाला लागले आहे आणि पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू होऊ शकतो. केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते. याआधी जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता. आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू आहे.

हे पहा Google Pay वरून 1 लाख रुपये कर्ज, 111 रुपये मासिक हप्त्यावर

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, याची केंद्र सरकारचे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने वाट पाहत आहेत. या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत शिफारसी केल्या जातील. या आयोगाच्या शिफारशी 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. भारतात पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये लागू झाला होता.

आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्याची कार्यपद्धती याबद्दल केंद्र सरकारने अजून कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात सरकारने स्पष्ट केले होते की, त्यांनी अद्याप आठव्या वेतन आयोगाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता लोकसभा निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल अशी आशा आहे.

मान्सून चा वेग, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी, पहा सविस्तर बातमी

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर सुमारे 49 लाख शासकीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शनवाढीचा फायदा होईल. या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची शिफारस केली जाईल, अशी अपेक्षा आहे. फायनॅन्शियल एक्स्प्रेसनुसार, यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ होण्याची शक्यता आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 14.29 टक्के वाढ

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 14.29 टक्के वाढ झाली होती. यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये करण्यात आले होते. त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाकडून अधिक चांगल्या शिफारशी येतील, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून आहे.

Leave a Comment