RTE प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत जाहीर, या दिवशी निवड यादी होणार प्रसिद्ध

RTE Admission Lottery Draw : आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष२०२४-२५ मध्ये ९ हजार २१७ खासगी शाळांमधील रिक्त असलेल्या १ लाख ५ हजार ३९९ जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरटीई पोर्टलवर प्राप्त अर्जामधून विद्यार्थ्यांची निवडीसाठी शुक्रवारी एससीईआरटी येथे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन सोडत लॉटरी काढण्यात आली. उच्च न्यायालय दाखल याचिकेवर दि. १२ जून रोजी सुनावणी झाल्यानंतर आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाले. या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, एससीईआरटीच्या उपसंचालक शोभा खंदारे, सहसंचालक कमलादेवी आवटे, प्राथमिक सहसंचालक देवीदास कुल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढल्यानंतर, काही दिवसांत संगणकीय प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १२ जूननंतर त्यांच्या नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना मिळतील.

अधिक माहीती येथे पहा

Leave a Comment