Maharashtra Government Central Press Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई- 04 यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील एकूण 54 पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून खाली नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव –
- सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) Assistant Supervisor
- वरिष्ठ मुद्रित शोधक (Senior Reader)
- मुद्रितशोधक (Reader)
- मूळप्रतवाचक (Copy Holder)
- दूरध्वनी चालक (Telephone Operator)
- बांधणी सहाय्यकारी (Binding Auxilary)
एकूण पदे – 54
शैक्षणीक पात्रता – सविस्तर शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा
वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षे, मागासवर्गीय – 43 वर्षे पर्यंत
पगार – कमीतकमी 18,000/- रू., जास्तीत जास्त 92,300/- रुपये
परिक्षा शुल्क – 1000/-, मागासवर्गीय – 900/- रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024