Gharkul Scheme : या जिल्ह्यात 13 हजार 462 घरकुलांसाठी मंजुरी

Gharkul Scheme : राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली होती. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देखील देण्यात आला होता. याच कार्यक्रमात 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयात विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात आला आहे.

सदर प्रवर्गास दिनांक 28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू असतील. या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मोदी आवास घरकुल योजनेत परभणी जिल्ह्याला एकूण 13 हजार 593 एवढे घरकुल मंजुरीसाठी उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी जिल्ह्यात एकूण 13 हजार 462 एवढ्या घरकुलांचे मंजुरी देण्यात आली असून एकूण 99.01 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार, असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे.

अश्याच नवीन माहितीसाठी येथे पहा.

Leave a Comment