अमरावती महानगर पालिकेत 2087 पदांची भरती – GR

Amaravati Municipal corporation Recruitment GR : अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गांतर्गत 2087 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत नगर विकास विभाग मार्फत दिनांक 01 मार्च 2024 रोजी महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अमरावती महानगरपालिका ही “ड” वर्ग महानगरपालिका असून, महानगरपालिकेची स्थापना दि.15 ऑगस्ट 1983 रोजी झाली आहे. अमरावती महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 121 चौ. कि.मी. इतके आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार अमरावती शहराची लोकसंख्या 6 लाख 46 हजार इतकी असून सद्यस्थितीत लोकसंख्या अंदाजे 9 लाखापेक्षा जास्त आहे.

अमरावती महानगरपालिकेकरिता अद्याप एकत्रित आकृतीबंध निश्चित करण्यात आला नव्हता. शहराचा झालेला विस्तार, वाढते नागरिकरण व महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अपुरा अधिकारी/कर्मचारी वर्ग लक्षात घेता शासनाच्या योजना, कार्यालयीन कामकाज निश्चित कालावधीत पार पाडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेसाठी आकृतीबंध निश्चित करून आवश्यक पदभरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरील शासन निर्णय अन्वये विविध संवर्गातील एकूण 2087 पदांच्या भरती करिता आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम ५१ (१), (२) व (३) मध्ये महानगरपालिका आयुक्तांनी विवरणपत्र तयार करुन ते स्थायी समितीसमोर मांडले पाहिजे व त्यामध्ये अधिकारी/ कर्मचारी, त्यांची संख्या, त्यांची पदनामे, श्रेणी, वेतन, फी, भत्ते इत्यादी नमूद करुन सादर करावे. त्यानंतर स्थायी समितीने फेरबदलासह मंजूर केलेले विवरणपत्र शासनास सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्य शासनास कलम ५१ (४) नुसार पदांना मान्यता द्यावी, अशी तरतुद आहे.

त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ रोजी मंजूर केला असून विविध संवर्गातील एकूण २०८७ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्याकरीता शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ अन्वये मान्यता प्राप्त तसेच, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार, यापूर्वी ४१ विभागांतील काही संवर्गातील शासन निर्णयांद्वारे व ठरावांद्वारे मान्यता प्राप्त २४५७ पदांपैकी ६५० पदे व्यपगत केल्याने, तसेच २८० पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या एकूण २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय पुढील प्रमाणे.

शासन निर्णय

अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४, तसेच आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१ (४) नुसार शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन यासोबतच्या प्रपत्र-व व ई मध्ये नमूद पदांच्या गोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध व प्रपत्र अ, आ, क, ड व इ यांना परिच्छेद क्रमांक ५ मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment