राज्यातील या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिक्षणासाठी 60,000/- रुपये मिळणार, दि.11 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिक्षणासाठी 60,000/- रुपये मिळणार, दि. 11 मार्च 2024 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग द्वारे इतर मागास वर्ग (ओबीसी) घटकातील विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास संदर्भिय दि.१३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यासाठी निकष व इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/ मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील.

मुलभूत पात्रता


१. विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
४. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
५. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
६. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
७. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.

८. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

शैक्षणिक निकष


१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPAचे गुण असणे आवश्यक राहील.
३. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
४. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
५. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.
६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
८. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
  • स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत)
  • कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  • भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र / करारनामा
  • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

Leave a Comment