मे महिन्यात बँका राहणार 14 दिवस बंद, सुट्ट्यांची यादी पहा

Amazon वरून महिन्याला कमवा 50,000/- रुपये, येथे पहा सविस्तर माहिती

Bank Holidays in May 2024 : तुम्हाला जर बँकिंग क्षेत्राशी निगडित काही काम असेल तर तुम्ही बँकेत जाण्यापूर्वी बँक कोणत्या दिवशी बंद आहे हे तपासणे महत्वाचे आहे, कारण असे केल्याने तुमचा महत्वाचा वेळ आणि होणार त्रास टळतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. तुमच्याकडे बँकिंगशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. मे महिन्यात अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मे महिन्यात एकूण 14 दिवस बंद राहतील, जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून बँक बंद असताना तुम्हाला अडचणी येऊ नयेत.

मे महिन्यातील 14 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश होतो. Bank Holidays in May 2024

Bank Holiday In May 2024

दिनांकसुट्टीचे कारण
1 मेमहाराष्ट्र दिन
5 मेरविवार
7 मे लोकसभा निवडणुकीमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद
8 मेरवींद्रनाथ टागोर यांची जयंती
10 मेबसव जयंती/अक्षय तृतीया
11 मे दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.
12 मेरविवार
13 मेवेगवेगळ्या राज्यात लोकसभा निवडणुका
16 मेआसाम, गंगटोक मध्ये सर्व बँकांना सुट्टी
19 मेरविवार
20 मेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, बेलापूर आणि मुंबईत बँका बंद
23 मेबुद्ध पौर्णिमा
25 मेचौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.
26 मेरविवार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, मे महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, या कालावधीत बँकांच्या सर्व ऑनलाइन सेवा सुरू राहतील. तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामाची चिंता करावी लागणार नाही. बँक बंद असताना तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकेशी संबंधित कामेही करू शकता. याशिवाय तुम्ही एटीएमवर जाऊन बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment