Bank Holidays: एप्रिल महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद, बघा कोणत्या दिवशी असेल बँकांना सुट्टी

Bank Holidays : एप्रिल मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद, बघा कोणत्या दिवशी असेल सुट्टी

पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बँकांना सुट्ट्या आहेत. एप्रिल 2024 मध्ये विविध झोनमध्ये एकूण 14 दिवस बँक सुट्ट्या असतील. वास्तविक, आजकाल बँकांशी संबंधित बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. पण अजूनही बँक खाते उघडणे, कर्ज घेणे अशी अनेक कामे बाकी आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी न पाहता तुम्ही बँकेच्या शाखेत गेलात तर तुमची निराशा होऊ शकते. याशिवाय तुमचे महत्त्वाचे कामही थांबेल आणि वेळही वाया जाईल.

अशा परिस्थितीत बँकेला सुट्ट्या कधी आहेत हे आधीच जाणून घ्या. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.

वारबँका बंद चे कारण
1 एप्रिल 2024वित्तीय वर्ष
5 एप्रिल 2024बाबू जगजीवनराम राम जन्मदिन
7 एप्रिल 2024रविवार
9 एप्रिल 2024गुडी पाडवा
10 एप्रिल 2024– इतर राज्यात बँका बंद
11 एप्रिल 2024ईद
13 एप्रिल 2024दुसरा शनिवार
14 एप्रिल 2024डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रविवार
15 एप्रिल 2024– इतर राज्यात बँका बंद
17 एप्रिल 2024राम नवमी
20 एप्रिल 2024– इतर राज्यात बँका बंद
21 एप्रिल 2024रविवार
27 एप्रिल 2024चौथा शनिवार
28 एप्रिल 2024रविवार

10,15 आणि 20 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रात बँका सुरू आहेत, काही राज्यात फक्त बँका बंद आहेत.

Leave a Comment