शेतकऱ्यांना प्रति महिना 3000/- मिळणार, फक्त हे काम करा…

या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अशा अनेक योजनांचा लाभ देत आहे. अशा प्रकारे रोज नवनवीन योजना व कामे केली जात आहेत.

देशभरात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात अशीच एक मोठी खूशखबर, आता एका योजनेअंतर्गत सगळ्यांना 3000/- रुपयाचा लाभ मिळणार आहे.

ही योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर, 2019 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3000/- रुपये देण्याची तरतूद आहे.

Post offfice pension scheme, आता प्रत्येकाला मिळणार महिन्याला 5,500/- रुपये फक्त हे काम करा

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘किसान मानधन योजना’. या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. साधारणत: म्हातारपणी शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘किसान मानधन योजना’ सुरू केली आहे.

त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत आहे आणि अशा प्रकारे तुम्हा सर्वांना या योजनेंतर्गत 3000/- रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशाचा लाभ तुम्हा सर्वांना थेट मिळणार आहे.

जर तुम्हा सर्वांना या योजने अंतर्गत 3000/- रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करावा आणि कोणती कागदपत्रे लागतील आणि या योजनेचे नाव काय आहे, अशी इत्यंभूत माहिती या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये देण्याचीही तरतूद आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

55 रुपये प्रति महिना भरा

18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात. शेतकरी कितीही वयात या योजनेचा भाग बनले तरी त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाते, याद्वारे ते त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेत खासरा, फेरफार आणि बँक खाते पासबुक असणे बंधनकारक आहे.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम तुम्हाला ‘किसान मानधन योजने’च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला टाकावा लागेल.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

अधिकृत वेबसाईट येथे पहा

Leave a Comment