Post office Pension Scheme : पोस्ट ऑफिस मधून प्रत्येकाला मिळणार महिन्याला 5500/- रुपये, फक्त हे काम करा.

Post office Pension Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये दर महिन्याला 9250 रुपये पेन्शन प्रमाणे गुंतवणूक केल्यावर रक्कम मिळवता येणार आहे.

निवृत्तीनंतरचा ताण कमी करण्यासाठी अनेकजण विविध बँकांमध्ये गुंतवणूक करतात; परंतु पोस्टाने पती-पत्नीसाठी सुरू केलेल्या मासिक बचत योजनेत पैसे गुंतवणूक करून पेन्शनचे टेन्शन मिटविता येणार आहे. संयुक्त, वैयक्तिक खात्यात नऊ ते १५ लाख रुपये गुंतविता येणार आहेत. तसेच पोस्ट ऑफिस हे सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे येथे सुरक्षिततेची 100 टक्के हमी आहे.

पोस्ट कार्यालयाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांचाही पोस्टाच्या या योजनेला प्रतिसाद मिळतो. पोस्ट कार्यालयाच्या वतीने आता पती- पत्नीसाठी मासिक बचत योजना सुरू करण्यात आली आहे. संयुक्तिक, वैयक्तिक खात्यात ९ ते १५ लाखांची रक्कम गुंतवून खातेदारांना त्यावरील व्याज पेन्शन प्रमाणे निवृत्तीनंतर वापरता येणार आहे.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना काय आहे?
पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेत रक्कम गुंतविल्यानंतर मासिक व्याज मिळते. संयुक्त, वैयक्तिक खात्यात नऊ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतविता येते.

दोन प्रकारचे खाते

वैयक्तिक : मासिक उत्पन्न योजनेत कोणालाही वैयक्तिक खाते काढता येते. या स्वात्यात नऊ लाख रुपये गुंतविण्याची मर्यादा आहे.

संयुक्त : पती-पत्नीचे संयुक्त खातेही या योजनेंतर्गत काढता येते. या खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते.


किती गुंतवणूक केली तर किती मिळतात?

पोस्टातील वैयक्तिक खात्यात नऊ लाख रुपये जमा करता येतात. यावर वार्षिक ७.४ टक्के व्याज मिळते. याद्वारे मासिक ५५०० रुपये तर वार्षिक ६६ हजार रुपये व्याज मिळते. हे वैयक्तिक खाते पाच वर्षांनंतर बंद करता येते.

पोस्टाच्या संयुक्त खात्यात अधिक प्रमाणात रक्कम गुंतवता येते. या खात्यामध्ये १५ लाख रुपये गुंतविले तर मासिक ९२५० रुपये आणि वार्षिक एक लाख ११ हजार रुपयांचे व्याज मिळते. हे संयुक्त खातेही पाच वर्षांनंतर परिपक्च होते आणि संबंधितांना ते बंदही करता येते.

वैयक्तिक आणि संयुक्तिक खात्यात केवळ पाच वर्षासाठीच २ रक्कम गुंतवता येते. ते खाते
परिपक्व झाल्यानंतर संबंधित ग्राहकांना ते बंद करावे लागते. ही योजना नागरिकांसाठी लाभदायक आहे.

पोस्टाच्या मासिक बचत योजनेकडे नागरिकांचा ओढ वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी संयुक्त, वैयक्तिक खाती काढली आहेत.

आता पेन्शनचे टेन्शन होणार नाही कारण पोस्टातून वर्षाला ६६ हजार रुपये मिळणार आहेत.


Leave a Comment