DA Hike : या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या (DA) महागाई भत्त्यात 5% वाढ

DA Hike : जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा DA मध्ये अगोदरच वाढवला आहे. आणखी एका राज्याने त्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

अलीकडेच 1 जानेवारी 2024 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 5% अतिरिक्त महागाई भत्ता त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी जाहीर केला आहे. या वाढीमुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 25 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

त्रिपुरा सरकारने महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा केली आहे, ही राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच नवीन वित्तीय वर्षात मोठे गिफ्ट मिळाले आहे.

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तांच्या आर्थिक भवितव्याला आधार देण्याचा निर्धार दाखवत आहे.

आता देशातील बहुतांश राज्यातील सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच 4 टक्के महागाई भत्ता वाढ होईल असे वृत्त आहे.

Leave a Comment