शासनाचा मोठा निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त मिळणार 10,500/- रू. इतके मानधन, परिपत्रक

State Government Employees News : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त 10,500/- रू. इतके मानधन मिळणार आहे.

चालू नवीन वर्षात हे मानधन मिळणार म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचा वर्षाव होत आहे; परंतु हे मानधन राज्यातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्य सरकारने मराठा समाज मागासवर्गीय आहे की नाही या यासंबंधी घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते. त्याकरिता राज्यातील विशिष्ट अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे काम त्यांच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त असल्यामुळे सरकारने त्यांना अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या संबंधित परिपत्रक काही निर्गमित करण्यात आले होते.

राज्यातील ज्या अधिकारी कर्मचारी यांनी मराठा समाज मागासवर्गीय आहे की नाही या यासंबंधी घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केलेले आहे. अशा अधिकारी कर्मचारी यांना वेतना व्यतिरिक्त 10,500/- रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सर्वेक्षणासाठी जे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते त्यांना सदरील शासन परिपत्रकानुसार, प्रति पर्यवेक्षक 10,500/- रुपये तर प्रति प्रशिक्षक 10,000/- रुपये इतके मानधन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा खात्यात जमा करण्यात येणार आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment