DA Hike : महागाई भत्ता 50% टक्के करणेबाबत दि. 19/03/2024 रोजी राज्य सरकारचा शासन निर्णय

DA Hike Shasan Nirnay : महागाई भत्ता 50% टक्के करणेबाबत दि.19/03/2024 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक ४२/०४/२०२४-P& PW (D) दिनाक १३.०३.२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केले आहे.

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक १.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली ४% महागाई भत्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

शासन निर्णय पहा

Leave a Comment