Police Bharti 2024 : अखेर पोलिस भरती प्रक्रिया जून नंतर, वाचा सविस्तर बातमी

Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलिस दलातील विविध घटकांत होत असलेल्या हजारो पदांच्या भरती करिता 31 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारी करिता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे.

31 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल. मात्र, आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत. परिणामी, पोलिस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलिस दलाने स्पष्ट केलेले नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात उमेदवारांना सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आचारसंहिता लागू असल्याने पोलिस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजना संदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील. त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेत 10 वी पास वर फायरमन पदांची भरती

दरम्यान, नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिस भरतीच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकीनंतरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

31 मार्च 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येणार आहे.

अर्ज नोंदणी करण्यासाठी policerecruitment2024. mahait.org या वेबसाइटवरून अर्ज नोंदणी करू शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

जाहीरात पहा

उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत. सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल. शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार अह. कागदपत्रे पडताळणी नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment