Bamboo Farming Subsidy : शेतकऱ्यांना बांबू लागवडी साठी 7 लाखाचे अनुदान

Bamboo Farming Subsidy : शेतीच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर कमीत कमी पाण्यात बांबूचे उत्पादन घेता येते. विशेषतः मग्रारोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानही मिळते. काही शेतकऱ्यांचा कल बांबू लागवडीकडे वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बांबू अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फळझाड व फूलपीक लागवड कार्यक्रम सुरू केला आहे.

या योजनेच्या माध्यमातून फळ बागेस प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेत बांबू लागवडीचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत ५९ फळपिके, चार फूलझाडे, १६ प्रकारच्या औषधी वनस्पती आणि चार प्रकारच्या मसाल्याच्या पिकांचा समावेश आहे. बांबूस अत्यंत कमी पाणी लागते. त्यामुळे नेहमी पाण्याची गरज भासत नाही. बांबूपासून अनेक वस्तू तयार केल्या जात असल्याने बांबूला अधिक मागणी आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बांबू लागवडीसाठी उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बांबूपासून विविध वस्तू, फर्निचर तयार केले जाते. त्यामुळे बांबूला मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांचा कलही वाढू लागला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा

काय आहे बांबू लागवड योजना


शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच राज्यात फळबागेचे क्षेत्र वाढावे म्हणून
मग्रारोहयोअंतर्गत फळझाड व फूलपीक लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

चार टप्प्यांत अनुदान मिळते

कधी मिळते एकूण रक्कम
लागवडपूर्व काम१,७९,२७१
प्रथम वर्ष संगोपन२,१४,६५३
द्वितीय वर्ष१,४४,२७४
तृतीय वर्ष१,५१,८९०

कोणाला मिळणार लाभ?

  • लाभार्अथी हा अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील असावा.
  • दिव्यांग, महिला शेतकऱ्यांनाही लाभ मिळतो. खुल्या प्रवर्गातील लाभार्थीना दोन हेक्टरपर्यंत लाभ घेता येतो.
  • कुटुंब प्रमुख महिला असावी, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी हवा.
  • शेतकऱ्याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त आणि पाच एकरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.
  • तसेच जॉबकार्ड असणे महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. त्यात बांबू लागवडीला आजवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. पोखराच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून बांबू लागवड करायची आहे. त्यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत तयार करून ग्राम पंचायतचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करायचे आहेत. यानंतर हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याचे संमती पत्र घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीला दाखवून तेथून मोफत बांबू रोपे खरेदी करावीत. आपल्या शेतात 15 बाय 15 अंतरावर लागवड करायची आहे. यानंतर शेतकऱ्यांना टप्याटप्यान 6 लाख 98 हजार रुपये मिळते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment