कर्मचाऱ्यांचा पगार ई – कुबेर प्रणाली मार्फत प्रदान करणेबाबत दि. 07/052024 रोजी परिपत्रक निर्गमित

E-Kuber System : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत ई कुबेर प्रणाली बाबत वेतन देयके प्रदान करणे संदर्भात दिनांक 07 मे 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे करावयाचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचा-यांची माहिती ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे.

याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ई-टेस्टींगसाठी फाईल आपणाकडे पाठविली असून यासोबत मॅपिंगसाठी व बीम्स इंटीग्रेशन मध्ये कोणते अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपले स्तरावरुन देणे आवश्यक आहे.

पंचायतराज सेवार्थ प्रणाली ही ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबींची पुर्तता होईपर्यंत पंचायतराज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयके ही प्रचलित पध्दतीनेच स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिका-यांना आपले स्तरावरुन देण्यास आपणांस विनंती करण्यात येत आहे.

परिपत्रक पहा

Leave a Comment