RTE Admission 2024-25 : या तारखेपासून RTE ची नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू

RTE 25% Admission 2024 : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आरटीई 25 टक्के राखीव जागांकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

400km रेंज असलेली टाटा नॅनो कार परत एकदा बाजारात दाखल

राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी आरटीईनुसार 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची अधिसूचना काढली. या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे या प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

CIBIL Score शिवाय मिळवा झटपट कर्ज, अशी करा प्रक्रिया

राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा खासगी शाळांसह सरकारी, अनुदानित शाळांची देखील नोंदणी करून घेण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील 76 हजार 53 शाळांमधील 25 टक्के राखीव यानुसार आठ लाख 86 हजार 411 जागांसाठी आतापर्यंत 69 हजार 361 पालकांनी अर्ज केले आहेत.

अधिक माहिती येथे पहा

राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होणार होता, त्यामुळे राज्य सरकारच्या अधिसूचनेविरूद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली.

राज्य सरकारने शिक्षणाचा अधिकार कायद्यातून इंग्रजी शाळा वगळल्याने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी कायद्यात केलेल्या दुरुस्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या केसवर निर्णय घेतला आहे, जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून आता पालकांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ‘RTE’ प्रवेशाची नव्याने प्रवेश प्रक्रिया ही दि. 14 मे 2024 पासून सुरू केली जाणार आहे.

नवीन प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार

RTE च्या नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील. गेल्या वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही RTE प्रवेशासाठी करण्यात आली होती, त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जाणार आहेत.

नवीन प्रवेश प्रक्रिया करिता नव्याने आदेश जारी केले जाणार असून यासाठीची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत सरकारी, अनुदानितच्या सर्व शाळांना वगळले जाणार असून केवळ खासगी शाळांमध्येच प्रवेश केले जाणार असल्याची माहिती विविध माध्यमांद्वारे समजली आहे.

1 किमी ची अटही शिथिल

2024-25 या शैक्षणिक वर्षात RTE च्या प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांच्या 1 किमी परिसरातील खासगी शाळांना आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. यामुळे राज्यभरातील बहुतांश शहरांमध्ये RTE च्या प्रवेशासाठी खासगी शाळांचे पर्याय कमी झाले होते. त्यामुळे आता नवीन प्रवेश प्रक्रियेत 1 किमी ची अटही शिथिल केली जाणार आहे.

नवीन RTE प्रवेश प्रकिया 15 दिवसांत पूर्ण केली जाणार असून, शाळा सुरू होण्यापूर्वीच RTE चे प्रवेश पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच RTE तून प्रवेश मिळून ते शाळेत दाखल होतील, यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

सरकारी, अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या 9 लाख 56 हजारांपैकी केवळ खासगी शाळांतील 1 लाखांच्या दरम्यान जागा उपलब्ध असतील.

Leave a Comment