7 व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते, आणि इतर देयके अदा करणेबाबत दिनांक 08/04/2024 रोजी शासन परिपत्रक पारित

7 व्या वेतन आयोगचे उर्वरित हप्ते, आणि इतर देयके अदा करणेबाबत सदरील शासन परिपत्रक शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे 01 यांचेकडून दिनांक 08/04/2024 रोजी पारित करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालय इतर विभागातील महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद/कटक मडळे येथून एकतर्फी/पती-पत्नी एकत्रिकरणातून आंतर जिल्हा बदलीने आपल्या विभागातील महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद/कटक मंडळे येथे बदलीने हजर झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देयके, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ निवड श्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदा करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये विनंती करण्यात आलेली आहे.

ही थकीत देयके मिळणार

नियमित थकीत वेतन इतर थकीत वेतन (वरिष्ठ वेतनश्रेणी, महागाई भत्ता, रजा वेतन, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते (1.2.3 व 4), वैद्यकीय देयके आणि इतर थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग- सर्व येथील कर्मचाऱ्यांना अदा करणेबाबत कळवले आहे.

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई आणि मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-01 यांना सदरील परिपत्रकानुसार कळवण्यात आले आहे.

Leave a Comment