RBI चा Cibil score सुधारणांबाबत नवीन नियम, काही दिवसातच CIBIL Score वाढणार

RBI CIBIL Score New Rules : अडचणीच्या वेळेत बऱ्याच लोकांना पैश्याची गरज पडत असते, म्हणून काही जण बँकेचे दार ठोठावतात, परंतु अश्या वेळेस जर तुमचा cibil score खराब असेल तर बँका कर्ज देण्यास नकार देतात.

ग्राहकांच्या समस्या महिनाभरात सोडवाव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने अधिकारी आणि वित्तीय संस्थांना दिले आहेत. तसे न झाल्यास त्यांना दंड भरावा लागेल. अलीकडेच RBI ने CIBIL स्कोअर बाबत अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये CIBIL स्कोरचे काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

क्रेडिट सूचना company (CIC) कर्जदार, कॉर्पोरेट्स आणि लहान व्यवसायांची क्रेडिट माहिती राखून ठेवते आणि बँका कर्ज वितरणाच्या वेळी किंवा आवश्यकतेनुसार त्यात प्रवेश करू शकतात.

डीफॉल्ट स्थिती सुधारल्यानंतरही, CIC ने वेळेवर माहिती अपडेट केली नाही, ज्यामुळे अनेक ग्राहकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळू शकले नाही. RBI ने म्हटले आहे की CIC ने वर्षातून एकदा क्रेडिट स्कोअरसह विनामूल्य क्रेडिट अहवालात सहज प्रवेश प्रदान केला पाहिजे. तसेच क्रेडिट संबंधित माहिती ईमेल आणि मेसेजद्वारे देखील दिली जावी, जेणेकरून क्रेडिट माहिती सहज उपलब्ध होईल.

RBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment