कर्मचाऱ्यांचे माहे मार्च चे वेतन 5 एप्रिल पूर्वी वितरण करणेबाबत, शासन परिपत्रक (GR)

कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल चे वेतन 5 एप्रिल पूर्वी वितरण करणेबाबत, शासन परिपत्रक (GR) प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांचेकडून निर्गमित करण्यात आले आहे.

रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त्य मार्च 2024 चे नियमित पगार दि. 5 एप्रिल 2024 पर्यंत करणेबाबत मा. श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.20 मार्च 2024 चे संदर्भातील निवेदन अन्वये सदरील पत्र निर्गमित केले आहे.

त्या संदर्भात रजनी रावडे प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, मा. शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य, पुणे यांना तश्या सूचना 27 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक काढून दिलेल्या आहेत.

शासन परिपत्रक पहा

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य नियमित पगार दि.5 एप्रिल 2024 पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे असे या परिपत्रक अन्वये कळवले आहे.

परिपत्रक पहा

Leave a Comment