Maharashtra State Board HSC SSC Result 2024: दहावी बारावी निकाल तारीख कधी? येथे पहा निकाल

Maharashtra State Board HSC SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य बोर्ड 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी (HSC) परीक्षा संपल्या आहेत. इयत्ता 10 वी ssc परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत पार पडल्या आहेत. तर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या आहेत.

आता सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दहावी बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे.

  • 2023 या वर्षी 12वी चा निकाल मे महिन्याच्या 25 तारखेला दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला होता
  • तसेच दहावीचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेला होता.

2024 या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे. पण या ही वर्षी 10वी आणि 12वी परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील.

येथे पहा 10वी 12वी चा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • महाराष्ट्र बोर्ड वेबसाईट – mahresult.nic.in

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • वेबसाईट वर तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) नमूद करा.
  • पुढे तुमच्या आईचे नाव नमूद करा. ( बोर्डाचा फॉर्म भरतानाचेच आईचे नाव नमूद करा. आईचे नाव नमूद केले नसल्यास ‘XXX’ असे नमूद करा.)
  • पुढे तुमचा निकाल दिसेल.

महाराष्ट्र बोर्डाने 10वी, 12वी परीक्षा बाबत निकालाची तारीख आणखी जाहीर केलेली नाही परंतु आपणास निकाल संबंधी अपडेट हे (https://results.gov.in / https://mahresult.nic.in) या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येतील.

Leave a Comment