‘या’ कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात दि.16 एप्रिल 2024 रोजी शासन परिपत्रक निर्गमित

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत दिनांक 16 एप्रिल 2024 रोजीचे सदरील परिपत्रक आहे.

सदरील परिपत्रक मधील संदर्भिय-1 अन्वये जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्याबाबत नमुद आहे. त्यानुसार संदर्भिय-2 व 3 नुसार कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश प्राप्त आहेत.

मेळघाट क्षेत्रात शिक्षकांच्या बऱ्याच जागा रिक्त असल्यामुळे प्रथम मेळघाटमधील रिक्त जागा भरणे क्रमप्राप्त असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदलीकरिता कार्यरत शिक्षकांपैकी इच्छूक शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीने पदस्थापना पाहिजे असल्यास अशा शिक्षकांचे अर्ज आपले स्तरावरून संकलित करून त्यांची एकत्रित यादीसह अर्ज या कार्यालयास सादर करावे.

तसेच दिनांक 31/03/2024 अखेर शिक्षकांची शाळा निहाय पटसंख्येनिहाय मंजूर/कार्यरत/रिक्त / अतिरिक्त पदांची अचूक माहिती सोबत सादर करावी.

बदली संदर्भात परिपत्रक पहा

Leave a Comment