या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत दि. 07/05/24 रोजी परिपत्रक निर्गमित

Employees Vehicle Allowance : कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत दि. 07/05/24 रोजी एक महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वित्त विभाग शासन निर्णय क्रं. वाहने 2009/प्रक्र 78 / सेवा 5/दि.05 एप्रिल 2010 अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन नियम 2019) अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि 01-01-2016 पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजुर केलेला वाहतुक भत्त्याच्या दरात वित्त विभाग शासन निर्णय क्र. वाहभ 2020/प्रक्र03/ सेवा 5/ दि. 20 एप्रिल 2022 अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे.

पोलिस भरती प्रक्रिया 2024 करिता एका पेक्षा जास्त अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी परिपत्रक जारी

अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांचे पत्र दि. 15 एप्रिल 2024 अन्वये महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जि. शाखा, परभणी यांनी उन्हाळी सुट्टीचे कालावधी वाहतुक भत्ता कपात केल्या बाबत या कार्यालयास कळवून कपात करण्यात आलेला वाहतुक भत्ता शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना मिळणे बाबत विनंती केलेली आहे.

करीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीचे कालवधीत माहे मे 2010 पासून कपात केला जात असलेला वाहतुक भत्ता संदर्भीय शासन निर्णय क्र. 1 व 2 च्या तरदुतीच्या आधिन राहून लागू करण्यात येत आहे. तरी ज्या मुख्याध्याकांचा उन्हाळी सुट्टी मध्ये वाहतुक भत्ता कपात करण्यात आलेले आहे त्यांना तात्काळ वाहतुक भत्त्याची रक्कम फरकासह आदा करण्यात यावी तसेच माहे मे 2024 च्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना वाहतुक भत्ता समाविष्ट करावा असे सदरील परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

परिपत्रक पहा

Leave a Comment