खूशखबर !! 10वी – 12वी परीक्षाची फीस परत मिळणार, येथे लगेच तपासा

Fee Refund Mh SSC-HSC : आताच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा पार पडल्या आहेत, परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाने विशिष्ट फिस आकारणी केली होती; परंतु ती फिस विद्यार्थ्याना परत केली जात आहे.

31 ऑक्टोंबर 2023 रोजी च्या शासन निर्णय अन्वये राज्यातील एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. म्हणून त्या तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या आणि दहावी बारावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीस परत केली जाणार आहे.

या तालुक्यामधील विद्यार्थ्यांची फीस परत मिळणार

सदरील शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य 15 जिल्ह्यांमधील 40 तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त 1021 महसूल विभागातील, बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024’ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

  1. इ.10वीसाठी `http://feerefund.mh-ssc.ac.in’ आणि
  2. इ.१२वीसाठी‘http://feerefund.mh-hsc.ac.in’

ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘http://mahahsscboard.in प्रसिध्द करण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईट येथे पहा

शासन निर्णय पहा

Bank Account चा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि. 28 मार्च, 2024 अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळास सादर (submit) करावयाची आहे. माहीती एकदा submit केल्यानंतर पुन:श्च submit करता येणार नाही. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळाकडे प्राप्त होणार आहे.

ही माहिती भरणे आवश्यक

पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची Bank Account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे. ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (Bank Account Number, Bank IFSC code,MICR code, खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) नव्याने भरणे आवश्यक आहे. रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.

येथे पहा यादीत तुमचे नाव

शासन निर्णय पहा

Leave a Comment