सोने आणखी 1700/- रुपयांनी स्वस्त, आता नवीन 1 तोळ्याचे दर पहा

गेल्या दीड ते दोन महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास 10 ते 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या सात दिवसांत 78,200 ही सर्वाधिक उच्चांकी दर पातळी गाठून सोन्याच्या प्रती तोळ्याच्या दरात 1700 रुपयांची घसरण झाली आहे. दरवाढ व घसरण यांचा परस्परविरोधी परिणाम सराफा बाजारावर होत आहे.

दर वाढीमुळे तर घसरण झालेले दरही आतापर्यंतचे उच्चांकी दर असल्याने मोडीचे (जुने सोने विक्री करण्याचे) प्रमाण दीडपटीने वाढले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गेल्या शुक्रवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर 74100/- रुपये होते. त्यापूर्वीच्या आठवडयात ते 74200/- रुपये या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.

मात्र, त्यानंतर सोमवारपासून सुरू झालेल्या चालू आठवड्यात गुरुवारपर्यंत सोने दरात तब्बल 1700 रुपयांची घसरण होऊन सोने 72400 रुपये तोळ्यावर खाली आले आहे.

सोन्याच्या दरातील चढउतार याला सद्यःस्थिती इराण व इस्त्रायल या दोन देशांतील युद्धजन्य स्थिती हे प्रमुख कारण असल्याचे सराफांचे म्हणणे आहे.

सोन्यातील दरवाढीसह लग्नसराईच्या तारखा कमी असल्याने सराफी बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. सरासरी हे प्रमाण 20 टक्क्यांनी घटले आहे. या आठवड्यात 1700 रुपयांची घसरण झाली आहे.

दरवाढीचा दुसराही परिणाम सराफ बाजारावर होत आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने भविष्यातील गुंतवणूक म्हणून घेतलेले सोन्याला उत्तम भाव मिळत असल्याने महिनाभरापासून सराफ बाजारातील मोडचे प्रमाण दीडपटीने वाढले आहे.

आणखी सोन्याची घसरण चे प्रमाण 5 टक्क्यांच्या जवळपास येऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दर अजून खाली येतील या शक्यतेने लग्नसराईची खरेदीही थांबली आहे.

Leave a Comment