पत्नीच्या संपत्तीवर पतीचा किती असतो अधिकार, उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले

SBI बँकेकडून पर्सनल लोन कसे घ्यावे? जाणून घ्या प्रोसेस

Property Rights : पत्नीच्या संपत्तीवर पतीचा किती असतो अधिकार, उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्टच सांगितले आहे.

HDFC बँक मधून घ्या 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज, येथे पहा सविस्तर

खंडपीठासमोर एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठ म्हणाले, स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे गैरवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर भारतीय दंड संहिताच्या कलम 406 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

अशा प्रकरणांमध्ये फौजदारी खटल्यांप्रमाणे ठोस पुराव्याच्या आधारे निर्णय घेऊ नये तर पत्नीचा दावा अधिक भक्कम असण्याच्या शक्यतेच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या अधिकाराचा वापर करून खंडपीठाने पत्नीचे सर्व दागिने हिसकावून घेतल्याबद्दल पतीला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे प्रकरण ?

याचिकाकर्त्या महिलेचा आरोप आहे की, 2003 मध्ये लग्नानंतर पहिल्या रात्री तिला भेट म्हणून मिळालेले सोन्याचे दागिने आणि वडिलांकडून मिळालेला 2 लाख रुपयांचा धनादेश पतीने स्वतःकडे घेतला नंतर आपल्या आईसोबत मिळून त्याने कर्ज फेडण्यासाठी पैसे खर्च केले. 2009 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला तिच्या पतीला 8.9 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. तथापि, केरळ उच्च न्यायालयाने हा आदेश बाजूला ठेवला आणि सांगितले की, पतीने ‘स्त्रीधन’ घेतल्याचे सिद्ध करण्यात पत्नी अपयशी ठरली आहे.

अशा प्रकरणांमध्ये फौजदारी खटल्यांप्रमाणे ठोस पुराव्याच्या आधारे निर्णय घेऊ नये, तर पत्नीचा दावा अधिक भक्कम असण्याच्या शक्यतेच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

स्त्रीला मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा-ठेवण्याचा स्त्रीला पूर्ण अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, ‘स्त्रीधना’वर पतीचे कोणतेच नियंत्रण नाही. संकटकाळात तो त्याचा वापर करू शकतो, पण नंतर परत करावे लागेल. खंडपीठ म्हणाले, स्त्रीला तिच्या स्त्रीधनावर पूर्ण अधिकार आहे.

लग्नापूर्वी, लग्नादरम्यान किंवा नंतर आई-वडील, सासर, नातेवाईक आणि मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तू म्हणजे स्त्रीधन, स्त्रीधन ही पूर्णपणे स्त्रीची मालमत्ता आहे आणि तिला तिच्या इच्छेनुसार विकण्याचा किंवा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Leave a Comment