सोन्याचा दर 1 लाखांवर जाणार, खरं कारण काय? सोने खरेदी करावे किंवा नाही

Gold Rate Update : मागील काही महिन्यांपासून सगळीकडे सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. सोन्याचे दराने नव नवीन रेकॉर्ड नोंदवत आहेत.

मार्च 2024 मध्ये सोन्याचा दर हा प्रति तोळा 65 हजार रुपये होता, तर एप्रिल मध्ये सोन्याच्या दराने उसळी मारली आणि तो 74 हजार रुपयावर जाऊन पोहचला. येत्या काही दिवसांमध्ये हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, हे दर 1 लाखांवर जाऊ शकतात असे म्हंटले जात आहे.

शेअर बाजारात मंदी असताना सोन्याचा भाव वाढतो हे नॉर्मल आहे; परंतु शेअर बाजारात सध्या उसळी सुरू असून सुद्धा सोन्याचे भाव का बर वाढतायत, यामागचे खरं कारण काय ते जाणून घेऊ.

आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते. मात्र अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2 एप्रिलपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,400 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,430 रुपये प्रति ग्रॅम होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारे लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते. मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत. या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे.

येथे सोन्याचा एक ट्रॉय औंस 31.1 ग्रॅम इतका आहे. सोन्याचा एक ट्रॉय औंस 1,800-1,900 डॉलर होता, त्यात किरकोळ वाढ झाली आहे आणि तो आता 2,256 डॉलरच्या वर आहे. डिसेंबर 2023 मध्ये 2,135 डॉलर इतकी वाढ झाली होती. या वाढीपेक्षा आत्ताचा दर 8 टक्क्यांनी जास्त आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 83.40 रुपये आहे. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे.

याशिवाय आयात शुल्क, युद्धजन्य परिस्थिती आदी कारणांमुळे देखील भाव वधारले आहेत. स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, दुबई इत्यादी देशांतून सोन्याची आयात केली जाते. भारत दरवर्षी सरासरी 800 टन सोने आयात करतो.

मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक संकट, तिथे रोजगार निर्देशांक खूप खाली गेला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रालाही मंदीचा फटका बसला आहे. शेअर बाजारातही मंदी आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा फर्म जे.पी मॉर्गनसह अनेक कंपन्यांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढतील. सोन्याच्या किमती 2025 पर्यंत वाढतच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या वेबसाईटवरून उपलब्ध असलेल्या माहितीवरून एकूण वर्षात होणाऱ्या मागण्यापेक्षा 50 टक्के मागणी लग्नसराईमुळे होते, हे सुद्धा सोने दर वाढीचे महत्वाचे कारण आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जग पातळीवरील घटक आणि सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक हे सोन्याचा दर वाढविण्यास कारणीभूत आहे. जागतिक पातळीवर सोन्याचे भाव वाढतच चालले, या क्षेत्रातील अभ्यासक म्हणतात की सोन्याचे भाव 1 लाखाच्या वर जाऊ शकतात.

यावरून तुम्ही अंदाज बांधू शकतात की तुम्हाला सोने खरेदी करायचे आहे असे किंवा नाही.

Leave a Comment