10वी 12वीच्या निकाला सबंधी मोठी बातमी ! या दिवशी निकाल लागणार, येथे पहा निकालाची तारीख, असा पहा निकाल

SSC HSC Examination Result 2024 : 10वी 12वीच्या निकाला सबंधी मोठी बातमी हाती आली आहे. 10वी 12 वी चा निकाल एकच दिवशी लागणार असल्याची वार्ता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होतील, त्यादृष्टीने बोर्डाची तयारी सुरु आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा 26 मार्च रोजी पडली आहे. बोर्डाच्या इयत्ता 10वी 12वी च्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. मागील ट्रेंडनुसार, maha ssc HSC exam result 2024 हा मे ते जून दरम्यान घोषित केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला पाठविले आहेत. दरवर्षी पहिल्यांदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. पण, यंदा दोन्ही वर्गांचे निकाल 5 जूनपूर्वीच जाहीर होतील, अशी सद्य:स्थिती असल्याचे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता 12वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच 10वीचा निकाल जाहीर करणार आहे.

संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात.

असा पहा निकाल

  • प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर होमपेज वरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
  • यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

SMS द्वारे निकाल पहा

  • मोबाइलमध्ये निकाल तपासण्यासाठी बोर्डाचे ॲप डाऊनलोड करा.
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी निकाल 2024 साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वी निकाल 2024 साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा
  • त्यानंतर 57766 या क्रमांकावर SMS पाठवा.
  • लगेच तुमच्या मोबाईल वर निकाल संबंधी सर्व तपशील पाठवला जाईल.

Leave a Comment