पोलिस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार, मैदानी चाचणी या दिवशी होणार

Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 17 हजार 471 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 होती, या भरती प्रक्रियेकरिता तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

लेखी परीक्षेसाठी 1:10 असे नियोजन असते; मैदानी चाचणी करिता एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारांना Cut off मार्क्स मध्ये येण्याकरीता बराच परिश्रम घ्यावा लागणार आहे. Police recruitment 2024

लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.

दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे.

साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असे वृत्त समजले आहे.

सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत मैदानी चाचणीचा वेळ

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 करिता अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून आता उमेदवारांना प्रश्न पडला असेल की अगोदर मैदानी चाचणी की लेखी परीक्षा; परंतु पोलिस भरती प्रकाशित जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 50 टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. मैदानी चाचणी नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी निवड होणार आहे. चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

Leave a Comment