Gold Rate : वर्षात सोने 20 टक्क्यांनी वधारले ! आजचा 1 तोळ्याचा भाव पहा

Gold Rate : सोन्यामध्ये एवढ्या वर्षात अचानक का बर वाढ झाली असेल, हा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि दागिन्यांना मिळणारी पसंती, अशा विविध कारणांमुळे सोन्याचा भाव गेल्या वर्षभरात 10 ग्रॅममागे 12 हजार रुपयांनी वाढला आहे.

तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या किमती येथे पहा

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आता तो 10 ग्रॅमला 75,500 रुपयांवर पोचला आहे. टक्केवारीचा विचार करता गेल्या मार्चपासून वर्षभरात सोने 20 टक्क्यांनी वधारले. वर्षअखेर हा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सर्व परिस्थिती सुरळीत झाली तरी सोन्याचा भाव लगेच कमी होण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षभरातील भाववाढ पाहता यापुढेही तेजी कायम भाव वाढण्याची प्रमुख कारणे राहू शकते. सोन्याचा भाव अपेक्षेच्या तुलनेत लवकर 70 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. यापुढे अशीच वाढ होण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

भाव वाढण्याची प्रमुख कारणे

सोन्याचे भाव वाढण्याचे अनेक कारणे आहेत, त्यामध्ये अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली खरेदी, इराण आणि इस्त्राईलमधील युद्धजन्य परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्धाचे संकट कायम जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, अमेरिका व युरोपातील बाजारपेठांतील मंदीचे वातावरण तसेच वाढत्या व्याजदरातील आणि अस्थिरता अपरिहार्य कारणांमुळे वाढलेली खरेदी यामुळे ह्या वर्षी सोने हे पाऊण लाखाच्या वर गेले आहे.

मागणीत अचानक झालेली वाढ, यामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. सोन्यातील गुंतवणुकीत चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे सुरक्षित ठरले आहे. जेवढी अनिश्चितता असेल तेवढे सोने वाढणार आहे. अनिश्चितता कायम राहील, असे वाटते.

पुढील सहा ते आठ महिने अशीच स्थिती राहू शकते. काही दिवसांनी एक ते दोन हजार रुपयांनी कमी-जास्त होऊन भाव स्थिरावतील. उत्पादनाच्या तुलनेत मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात 66 सोन्याची खरेदी केली आहे. त्याशिवाय इतर काही कारणांमुळे सोन्याचा भाव वाढत आहे. येत्या वर्षअखेरीस सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

आणखी माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment