ई-कुबेर प्रणालीतून होणार शासकीय नोकरांचा पगार, काय आहे ई-कुबेर प्रणाली जाणून घ्या.

Government Employees Salary News : आता ई-कुबेर प्रणालीतून माहे एप्रिल पासून शासकीय नोकरांचा आणि सेवानिवृत्तिवेतन धारकांचा पगार वितरीत केला जाणार आहे.

सरकारी नोकरांचे पगार आणि सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने प्रणालीमध्ये बदल केले आहेत. आता पेन्शनधारक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार रिझर्व्ह बँकेकडून केले जाणार आहेत. शासनाकडून आरबीआयकडे पैसे जमा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळणार आहेत. एप्रिल महिन्याची पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल.

सरकारकडून १ एप्रिलपासून देशात ई-कुबेर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. यानुसार पेन्शन देण्यासाठी असलेली ईसीएस, एनईएफटी, सीएमपी, सीएमपी फास्ट प्लस आदी पर्याय बंद करून पूर्ण क्षमतेने ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले होते.

एप्रिल महिन्याची पेन्शन ई-कुबेर प्रणालीद्वारे मिळणार आहे. पूर्वी सर्व निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन ही एसबीआय बँकेकडून वितरित करण्यात येत होती. मात्र, आता पेन्शन ई-कुबेर प्रणालीद्वारे आरबीआयकडून वितरित करण्यात येणार आहे. एसबीआय खातेधारक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आयएफएससी कोड द्यावा लागेल.

ज्या कर्मचार्यांनी बँकेचे खाते देताना आयएफएसी कोड बदलले नाहीत अशा निवृत्तीवेतनधारकांना नवीन प्रणालीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ई-कुबेर प्रणालीमुळे पेन्शन आणि वेतन वितरणामध्ये सुधारणा होईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल. ज्या पेन्शनधारकाने वेतन जमा होणाऱ्या बँकेचे खाते बदलले आहे, अशा निवृत्त कर्मचाऱ्यांनी सुधारित बँक खात्याचा क्रमांक व आयएफएससी क्रमांक कोषागार कार्यालयाकडे द्यावा.

शासकीय कार्यालयाकडून आलेली कर्मचाऱ्यांची यादी कोषागार कार्यालयाकडून आरबीआयकडे पाठवण्यात येईल. यानंतर आरबीआयकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार टाकण्यात येणार आहे. सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार ई-कुबेर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याचे वेतन नवीन प्रणालीद्वारे होणार आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Leave a Comment