आनंदाची बातमी : सरकारचा मोठा निर्णय, शासकीय कर्मचाऱ्यांना 25 लाख रू. ग्रॅच्युईटी रकमेवर Tax सूट

Government Employees Grauity News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाला आहे, आता शासकीय कर्मचाऱ्यांना 25 लाख रू. ग्रॅच्युटी रकमेवर Tax सूट मिळणार आहे, त्या सबंधित वृत्तांत पुढे पहा.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा 25 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 20 लाख रुपये होती.

कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीची करमुक्त मर्यादा 25 लाख रुपये केली आहे. आता या रकमेपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कोणताही कर लागणार नाही.

यापूर्वी त्याची मर्यादा 20 लाख रुपये होती. 8 मार्च 2019 रोजीच्या अधिसूचनेत, CBDT ने करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली होती.

महागाई भत्त्यात 4% वाढ

याशिवाय केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. ते मार्च अखेर पगारासह जमा केले जाईल. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 12,868.72 रुपयांचा बोजा वाढणार आहे.

50 टक्क्यांनंतर DA 0 होईल

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के भत्ता मिळणार आहे. पण, त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल. यानंतर 0 पासून महागाई भत्त्याची गणना सुरू होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के डीए जोडला जाईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9000 रुपयांच्या 50 टक्के रक्कम जोडली जाईल.

Leave a Comment