शिपाई, भांडारपाल, प्लंबर, मिस्त्री, वायरमन आणि इतर पदांची भरती, नोकरीची सुवर्णसंधी

भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक,संगणक सहाय्यक शिपाई आणि इतर पदांच्या भरतीची जाहिरात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा, जी पुढे दिली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

सरळसेवेने भरावयाच्या पदाकरिता https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत, उमेदवारांनी https://shrituljabhavani.org या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://ibpsonline.ibps.in व https://shrituljabhavani.org या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन (Online) पध्दतीनेच https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत, सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

परीक्षेचा दिनांक, वेळ व परीक्षा केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठीची स्वतंत्र लिंक https://ibpsonline.ibps.in व https://shrituljabhavani.org या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल.

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024

अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment