40 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे शासन शुद्धिपत्रक निर्गमित

Government Employees News : राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी महत्वाचे असे शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता, त्यामध्ये महत्वाचा सुधारणा करणेबाबत वरील शासन शुद्धिपत्रक आहे.

शासन निर्णय पहा

वरील शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली होती; परंतु शासनाने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी त्या सबंधित पुढील शुद्धिपत्रक काढले आहे.

शासन शुद्धिपत्रक

शुद्धिपत्रक येथे पहा

वर्ष ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत या शासन निर्णयान्वये “अपवादात्मक बाब” म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०८.१२.२०२२ च्या प्रपत्र “अ” येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहीत कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्यात यावी. तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी लागू राहतील.०३. सदर शासन निर्णय गृह विभागाची नस्ती क्र. कल्याण-०१२३/प्र.क्र.०४/पोल-७ वर मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment