IMD rainfall alert : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचे संकट, जाणून घ्या हवामान विभागाचा नवा अंदाज

IMD rainfall alert : मागील काही दिवसांपुर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. सध्या ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरू आहे, तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदानुसार महाराष्ट्राप्रमाणेच जम्मू – काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बाकी नजीकच्या जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment