राज्यातील या कर्मचाऱ्यांना 5000/- प्रती महिना वाढीव मानधन

Employees Payment Increase News : राज्यातील या कर्मचाऱ्यांना 5000/- प्रती महिना वाढीव मानधन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हे वाचा 👉 राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

आशा सेविका विषयी माहिती

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ASHA या मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक ASHA तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक ASHA नियुक्त करण्यात आली आहे.

हे पहा 👉 पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! एकदा गुंतवणूक करा आणि दर महिन्याला 5550/- रुपये कमवा

ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे ASHA मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही ASHA वर असते. ग्रामीण भागातील ASHA या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे ASHA ना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.

Leave a Comment