पोलिस पाटलांच्या मानधनात 15,000/- रुपये वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Police patil Salary Increase gov decision : पोलिस पाटलांच्या मानधनात 15,000/- रुपये वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय..

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनकडून मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुसार पोलिस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला आहे.

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता पोलीस पाटलांना महिन्याला 15 हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. सध्या मिळणाऱ्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. राज्यात 38,725 पोलिस पाटलांची पदे आहेत. सध्या त्यांना महिन्याला 6,500 रुपये मानधन दिले जाते.

हे पहा 👉 राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात भरभरुन वाढ केली आहे. आता पोलिस पाटलांना मिळणार महिन्याला 15 हजार रुपये. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांचे मानदन वाढवण्याची मागणी होत होती. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. त्यामध्ये 2019 मध्ये वाढ करण्यात आली. हे मानधन 6 हजार 500 इतके करण्यात आले होते.

आता पोलीस पाटलांना महिन्याला 15 हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत.

Leave a Comment