खुशखबर..!! : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Important news for 10th class students : खुशखबर ..! दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

मध्यान्ह भोजन योजना

मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळत होता; परंतु आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. त्यामुळे आता आठवी, नववी बरोबरच आता दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. ही योजना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करावी. अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. तसेच शहरी भागासाठीही अमृत आहार योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळणार आहे. ही बातमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खरोखरच लाभदायी ठरेल.

अशाच नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment