आयकर विभागा मध्ये तब्बल 12 हजार पदांची भरती होणार, पहा डिटेल्स

Income Tax Department recruitment 2024 : सरकारी नोकरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे, कारण आयकर विभागात एकूण 12 हजार पदे भरली जाणार आहेत. आयकर विभागात सध्या १० ते १२ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया विभागाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना दिली.

या भरती बाबतची अधिसूचना लवकरच आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. 2009-10 पर्यंतच्या काळातील 25 हजार रुपयांची बाकी आणि 2010-11 ते 2014-15 या काळातील 10 हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या मध्ये 1962 पासून प्रलंबित असलेली 1.11 कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम 3500 ते 3600 कोटींच्या जवळ आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 80 लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, 25 हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो.

2023 मध्ये झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये 1760 कोटींचा मुद्देमाल आयकर विभागाने जप्त केला. त्यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा हा आकडा 07 पट जास्त होता. 2022 मध्ये निवडणुकांत जप्तीचे प्रमाण 2017 च्या तुलनेत 6 पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये रोख रक्कम जप्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे नितीन गुप्ता म्हणाले. सध्या आयकर विभागात एकूण 55 हजार कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे लवकरच आता आयकर विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

अधिक माहीती येथे पाहा

Leave a Comment