या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

State employees retirement age update : सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्या संबंधित सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत राज्य स्तरावर चर्चा करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे.

5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासकीय सेवेत समाविष्ट असलेल्या या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. Retirment age update

राज्यातील फक्त कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षे करण्याचा निर्णय 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्या बाबतचा निर्णय हा 2015 मध्ये घेण्यात आला होता. या विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे.

लवकरच इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार अशी बातमी विविध वृत्त माध्यमांद्वारे समोर येत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment