जिल्हा परिषद अंतर्गत 90% अनुदानावर शिलाई मशीन करिता ऑनलाईन अर्ज सुरू

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. त्याच प्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन करिता ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. लाभार्थी ऑनलाईन अर्ज दिनांक 09 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करू शकतात. Shilai machine apply online

90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन या योजनेचे नाव –

  • ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे.
  • ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे.

या योजनांशी संबधित अटी शर्ती खाली देण्यात आलेल्या आहेत. तसेच अर्जाचा नमुना फॉर्म पुढे डाऊनलोड करू शकता. खाली दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात येणार आहेत व पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy व Hard Copy संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभाग या कार्यालयास सादर करावी लागणार आहे.

अर्ज फॉर्म येथे डाऊनलोड करा

90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन करिता कागदपत्रे आणि अटी व शर्ती पुढे पाहुयात..

संबंधित महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत सेस 2023-24 च्या या योजनेचे ऑनलाईन अर्ज सध्या बुलढाणा जिल्हा परिषद मार्फत सुरू आहेत.

इतर जिल्ह्याचे अर्ज देखील लवकर सुरू होतील त्या करिता आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभाग येथील कार्यालयास संपर्क साधा.

90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन करिता लागणारी कागदपत्रे

अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः सांक्षाकित करुन या प्रमाणे जोडण्यात यावीत.

  • अर्जदार यांचा वयाचा दाखला / TC झेराक्स प्रत.
  • अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशनकार्ड झेराक्स आवश्यक.
  • अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त / अपंग / विधवा/दारीद्द्र रेषा खालील असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड झेराक्स प्रत.
  • बैंक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेराक्स प्रत IFSC कोड नमुद असावा.
  • इलेक्ट्रीक बील (विज बीलाची प्रत आवश्यक)

90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन करिता अटी व शर्ती

  • अर्जदार हे ग्रामिण भागातील रहिवाशी असावा.
  • अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र / दाखला सा 2022-23 या वर्षाचे जे मार्च 2024 पर्यंत वैध असेत ते जोडावे. अर्जासोबत उत्पनाचा प्रमाणपत्र / दाखला आसल्यास अर्ज आकारण्यात येईल.
  • अर्ज परीपुर्ण असावा अपुर्ण अर्ज / विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही. किंवा त्या बाबत कोणताही पत्र व्यव्हार केला जाणार नाही.
  • लाभार्थी ग्रामीण भागातील असावी तीचे वय 17 ते 15 असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी 17 पेक्षा कमी व 45 पेक्षा जास्त नसावे.
  • मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थीती मध्ये विचार केला जाणार नाही.

Leave a Comment