मोठी बातमी : महाराष्ट्रातील या मुलींना मिळणार जून 2024 पासून मोफत शिक्षण, वाचा सविस्तर बातमी

Girls in Maharashtra Free education from June 2024 : राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेत 600 वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत.

अधिक माहिती येथे वाचा

इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकल अभ्यासक्रम/ शिक्षण पूर्ण करण्यासाठी तर इतर अभ्यासक्रम पेक्षा जास्त खर्च येतो. उच्च शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे सामान्य घरातील मुलांना शक्य होत नाही, त्यामुळे गुणवंत विद्यार्थी मोठ मोठ्या पदापासून वंचित राहतात; परंतु आता उच्च शिक्षणसाठी मुलींना सर्व सुविधा आणि फी माफ होणार आहे, म्हणजेच शिक्षण मोफत मिळणार आहे.

RBI 100 रुपयाच्या नोटेवर बंदी घालणार, जाणून घ्या सत्य..

मुलींना 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत

मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी आहे, येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. या संबंधित राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्यांने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळण्याची मागणी केली. त्यावर बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जून 2024 पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही.

जवळपास 600 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः संवेदनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफी विषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment