खूशखबर : ‘पीएफ’ वर 8.25% व्याज, 8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ

EPFO Update: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ‘CBT च्या 235 व्या बैठकीत 2023-24 साठी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची शिफारस वित्त मंत्रालयाकडे पाठवली जाणार आहे. मंजुरीनंतर नव्या दरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये 8.05 टक्के व्याज दिले गेले होते. 202-21 मध्ये हा व्याजदर कायम ठेवण्यात आला होता.

Government employees pension and grauity rule : या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन आणि ग्रॅच्युइटी चा लाभ

8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ

2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्याची शिफारस अर्थमंत्रालयाला केली आहे. त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षांत ‘पीएफ’वर 8.25 टक्के व्याज मिळणार आहे.

खात्यात येणार 1 लाख 7 हजार कोटी

आर्थिक वर्ष 2023-24 साठी, सीबीटीने एकूण 13 लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर 8 कोटी ईपीएफ सदस्यांच्या खात्यात 1,07,000 कोटी रुपयांचे व्याज वितरित करण्याची शिफारस केली आहे.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment